Course Details​ of B.SC. Nursing

बीएससी नर्सिंग कोर्स कसा करावा?

मित्रांनो जर तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्स करायचा असेल. तर त्यासाठी तुम्हाला पीसीबी ग्रुप मधून 12 वी पास व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यावा लागेल.

बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन कसे भेटेल?

मित्रांनो बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला याची प्रवेश परीक्षा ( Entrance Exam) द्यावी लागेल. या व्यतिरिक्त याचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट (Private Institute) सुद्धा असतात. ज्यात तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतात. परंतु जर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल. तर त्यासाठी तुम्हाला Entrance Exam द्यावी लागते.

बीएससी नर्सिंग मध्ये काय सॅलरी असते?

कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीस 10 ते 15 हजार पर्यंत मिळते. जर तुम्ही चांगल्या संस्थेमधून बीएससी नर्सिंग केले असेल. तर तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी पण चांगलीच मिळेल. या कोर्सला केल्यानंतर सुरुवातीला तुमची सॅलरी थोडी कमी असू शकते. पण जास्तीत जास्त तुमचा अनुभव वाढेल त्यानुसार सॅलरी ही वाढेल.

बीएससी नर्सिंग केल्यानंतर जॉब कशी मिळेल?

मित्रांनो अशी भरपूर कैंडिडेट असतात ज्यांनी बीएससी नर्सिंग केलेले असते. परंतु त्यांना जॉब भेटत नाही बेरोजगार असतात. भरपूर प्रयत्न करूनही त्यांना जॉब भेटत नाही. याच्यासाठी मी तुम्हाला सांगून देतो की कोर्स करताना आणि कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला नर्सिंग कॉलेज कडून इंटरशिप करण्यासाठी सांगितले जाते. तुम्ही त्या इंटरशिपला इमानदारीने केले पाहिजे आणि शिकण्यावरती विशेष लक्ष दिले पाहिजे.

जेव्हा तुम्हाला नर्सिंग चे काम यायला लागतं तेव्हा जॉब मिळण्यामध्येही काही प्रॉब्लेम होणार नाही. या क्षेत्रामध्ये पुस्तकी नॉलेजला काहीच महत्त्व दिले जात नाही. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल रूपाने गोष्टी शिकणे आणि ते इम्प्लिमेंट करणे महत्त्वाचे असतं. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लगेच कोणत्या ना कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये जॉब साठी प्रयत्न केले पाहिजे.

नाहीतर तुम्हाला जॉब लवकर मिळणार नाही. आणि तुम्ही बेरोजगार राहणार. कारण लोक विचार करणार की तुमच्याकडे नॉलेज नाहीये. मग आता तुम्हाला जॉब भेटत नाहीये. सुरुवातीच्या काळात तूम्ही जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सॅलरी वरती जास्त लक्ष नाही दिले पाहिजे. कारण जॉब मिळाला म्हणजे तुमची सॅलरी ही अनुभवानुसार वाढेल.

काही लोक काय करत असतात की कमी सॅलरीच्या चक्कर मध्ये जॉब सोडून देतात. ज्या कारणामुळे त्यांना शेवटी जॉब भेटत नाही.. यामुळे तुम्ही सॅलरी चा विचार न करता जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे काम यायला लागेल तेव्हा तुमची सॅलरी वाढून जाईल. जर ते हॉस्पिटल तुम्हाला चांगली सॅलरी नाही देत असेल. तर तुम्ही नर्सिंग च काम तर चांगल्या प्रकारे शिकलेले आहेतच तर तुम्ही ते हॉस्पिटल सोडून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जॉब साठी अप्लाय करू शकतात आणि त्या ठिकाणी चांगली सॅलरी मिळवू शकतात.

बीएससी नर्सिंग कोर्स साठी काय शैक्षणिक योग्यता असावी लागते?

या कोर्सला करण्यासाठी तुमचे 12 वी पास असणे अनिवार्य आहे

• 12 वी तुम्ही सायन्स शाखेतून केले असायला पाहिजे. 12 वी मध्ये तुम्ही Physics, Chemistry, Biology आणि English विषय असायला पाहीजेत.

• 12 वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 55% गुण असायला पाहिजे

Age Limit – बीएससी नर्सिंग कोर्स करण्यासाठी तुमचं वय 17 ते 35 वर्षाचा मध्ये असायला पाहिजे

बीएससी नर्सिंग कोर्स केल्यानंतर काय करावे?

मित्रांनो बीएससी नर्सिंग केल्यानंतर तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात. ज्यामध्ये पहिला ऑप्शन असा आहे की नर्सिंग च्या field मध्ये तुम्ही जॉब करू शकतात. दुसरा ऑप्शन असते की बीएससी नर्सिंग केल्यानंतर तुम्ही मास्टर डिग्री म्हणजेच एमएससी नर्सिंग करून Teaching आणि Reasearch Field मध्ये जाऊ शकतात. बीएससी नर्सिंग केल्यानंतर तिसरा ऑप्शन तुम्हाला नर्सिंगच्या कोणत्याही एका फील्डमध्ये Specialist होऊ शकतात.