Course Details​ of ANM

ANM म्हणजे काय?

नर्सिंग हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण विविध प्रकारे रुग्णांची सेवा करू शकतो. सध्याच्या काळा मध्ये नर्सिंग हे एक खूप महत्त्वाचा आणि जास्त मागणी असलेले क्षेत्र आहे. ANM Full Form म्हणजेच Auxiliary Nursing Midwifery. ANM हे हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या विविध प्रकारे सेवा करण्यासाठी तत्पर असते.

ANM हा वैद्यकीय क्षेत्रात संबंधीचा एक नर्सिंग कोर्स आहे.

ANM nursing course साठी आवश्यक के पात्रता

  • १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही ANM मध्ये प्रवेश घेऊ शकता.
  • तसेच जो उमेदवार यासाठी निवेदन करणार आहे तो वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे खूप गरजेचे आहे.
  • प्रवेशासाठी किमान वय 17 वर्षे असावे.
  • तुम्ही वयाच्या ३५ वर्षापर्यंत प्रवेश घेऊ शकता.

वर्षातून एकदा प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जाते.

ANM nursing course मध्ये काय शिकविले जाते?

ANM nursing course मध्ये प्रामुख्याने डॉक्टरांच्या गैरहजेरी मध्ये एखाद्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी याबद्दल शिकवले जाते या व्यतिरिक्त ANM nursing course विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.

सामुदायिक आरोग्य नर्सिंग, पोषण, आरोग्य संवर्धन, मानवी शरीर आणि स्वच्छता, पर्यावरण स्वच्छता, मानसिक आरोग्य, संक्रमण आणि लसीकरण, संसर्गजन्य रोग, प्राथमिक वैद्यकीय सेवा, प्रथम उपचार, बाल आरोग्य, सुईणी, आरोग्य केंद्र व्यवस्थापन, प्रसुतीपश्चात वार्ड, इ. प्रशिक्षण दिले जाते.

ANM nursing course पूर्ण झाल्यावर पुढे कोणते शिक्षण घेऊ शकतो?

ANM nursing course पूर्ण झाल्यावर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये सहाय्यक उपचारिका नर्स म्हणून काम करू शकता. याव्यतिरिक्त जर तुम्हाला पुढे शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतर कोणत्याही कोर्ससाठी किंवा पदवीसाठी अप्लाय करू शकता.

ANM nursing course पूर्ण झाल्यावर जॉब भेटतो का? ANM या कोर्सला स्कोप आहे का?

ANM nursing course पूर्ण झाल्यावर तुम्हाला जॉब भेटू शकतो. ANM nursing course पूर्ण झाल्यावर तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सहाय्यक उपचारिका नर्स म्हणून काम करू शकता. या व्यतिरिक्त एखाद्या एनजीओ मध्ये, ग्रामीण स्वास्थ केंद्रामध्ये, मेडिकल लॅबोरेटरी मध्ये, क्लिनिक मध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये आणि ग्रामीण स्वास्थ्य कर्मचारी म्हणून काम करू शकता.